सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जो नावलौकिक मिळवला आहे त्यामध्ये कामगारांचा सिंहाचा वाटा राहिला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. सोमेश्वर साखर कारखान्याचे १७ कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार जगताप व संचालकमंडळाच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी जगताप बोलत होते. सोमेश्वरमध्ये अनेक चढ उतार आले पण कामगारांनी समर्थ साथ दिली. कारखाना प्रति दिन दहा हजार गाळप क्षमतेवर पोहोचलो आहे यात सभासदांच्या बरोबर कामगारांचा पण वाटा महत्वाचा आहे कामगारांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा केल्यामुळे सोमेश्वरने नावलौकिक मिळवला असल्याचे जगताप म्हणाले.
जेष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांनी सेवानिवृत्त कामगारांनी कुटुंब सुरक्षित राहणे कामे व आरोग्य विमा कामी जागरूक राहावे अशी सूचना केली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सेवानिवृत्त कामगारांनी त्यांच्या सेवानिवृत्त वेतनाचे आर्थिक नियोजन करावे असे सांगितले. यावेळी सोमेश्वरच्य उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, जेष्ठ संचालक सुनील भगत, शैलेश रासकर, शांताराम कापरे, ऋषिकेश गायकवाड, अभिजित काकडे, बाळासाहेब कामथे, रणजित मोरे, तुषार माहुरकर, जितेंद्र निगडे, कमल पवार, हरिभाऊ भोंडवे,किसन तांबे, अनंत तांबे, प्रवीण कांबळे, सेक्रेटरी के.डी. निकम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी केले. आभार कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी मानले.
COMMENTS