पुरंदर ! शरद-विजय सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब निगडे तर उपाध्यक्षपदी नरेंद्र रासकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
कर्नलवाडी (ता.पुरंदर ) येथील शरद विजय विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब विठ्ठल निगडे तर व्हॉईस चेअरमनपदी नरेंद्र दगडोबा रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.०८) या संदर्भातील निवडणूक सोसायटीच्या नीरा येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. ही निवड बिनविरोध करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी जाहीर केले. 

  कर्नलवाडी येथील शरद विजय विकास सेवा सोसायटीचे मावळते चेअरमन ज्ञानदेव बुवसो निगडे आणि  व्हा.चेरमन दिलीप बबन निगडे यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. या पदांसंदर्भात सोसायटीच्या नीरा येथील कार्यालयामध्ये निवडणूक घेण्यात आली. यामध्ये बाळासाहेब निगडे यांनी चेअरमन पदासाठी तर नरेंद्र रासकर यांनी व्हॉईस चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात निर्धारित वेळेत कोणताही अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. 

      या निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने चेअरमन व्हाईट चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्नलवाडी येथील जयवंत कोंडे, पृथ्वीराज निगडे, भरत निगडे, योगेश निगडे,नंदकुमार निगडे, दिलीप भोसले, प्रमोद निगडे, रणजित निगडे, भानुदास पाटोळे, विजय कोंडे, सत्यवान निगडे, दीपक भोसले, धनराज कोंडे, प्रशांत रासकर, अशोक  रासकर, अरुण निगडे, बुवासो निगडे, कारण निगडे, सचिव निखील निगडे व सर्व संचालक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top