भोर ! संतोष म्हस्के ! 'तो' ३६५ दिवसात ३७० किल्ल्यांवरील माती संकलन करून त्या मातीपासून बनवलेली छत्रपती 'शिवाजी' महाराजांची 'मूर्ती' घेऊन जाणार एव्हरेस्टवर ! रायगडच्या सुबोधने १९३ दिवसात सर केले २७१ किल्ले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार किती श्रेष्ठ आहेत आणि त्या विचारांना अढळ उंचीवर पोचवण्यासाठी ध्येयवेडा होऊन ३६५ दिवसांत ३७० गडकिल्ले सायकलने प्रवास करीत सर करण्यासाठी माऊंट एवरेस्टकडे निघालेल्या रोहा रायगड येथील दुर्गरोहक सुबोध गांगुर्डे यांचे भोर शहरात तरुणांकडून स्वागत करण्यात आले.                                रोहा (रायगड )येथील ध्येयवेडे दुर्गरोहक सुबोध कुंदा विजय गांगुर्डे हे सायकलवर प्रवास करीत महाराष्ट्रातील लहान-मोठे ३७० किल्ले सर करुण प्रत्येक गड किल्ल्यावरील माती संकलन करून या माती पासून छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती बनवली जाणार आहे.या मातीची मूर्ती जगातील सर्वात ऊंच माउंट एवरेस्टवर घेऊण जाणार आहे. गांगुर्डे यांनी आतापर्यंत १९३ दिवसात २७१ पर्यंत गडकिल्ले सर करून १० हजार ५०० किलोमिटर सायकलने प्रवास केला आहे.पुणे जिल्ह्यातील इतर गडकिल्ले सर करण्यासाठी गांगुर्डे यांचा प्रवास भोर शहरातून नुकताच सुरू असताना शहरातील तरुणांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सचिन देशमुख,शिक्षक पतसंस्था सभापती बापू जेधे,अतुल काकडे,निलेश थोरवे, रोहन भोसले उपस्थित होते.
To Top