सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा - प्रतिनिधी
आ . शिवेद्र सिंह राजे भोसले यांच्या प्रयत्नान लाखों रुपये खर्च करून सातारा महाबळेश्वर रोड मधील दुभाजका मध्ये बसविलेले स्टेटलाईट दिवे गत चार पाच दिवस बंद पडले असून नगर पंचायतीच्या गलथान कारभारामुळे मेढा नगरी ऊंधारात बुडाली आहे. मेढा शहरामध्ये रस्ते रुंदीकरण झाल्यानंतर फक्त रस्ते वेगवान झाले पण मागील दोन महिन्यांमध्ये बसविण्यात आलेले पथदिवे उजाळा देताना दिसत नाहीत.
मेढा गाव बाकी सर्व बाजूने शहरासारखे दिसायला लागले परंतु मेढा शहरामध्ये बसवण्यात आलेल्या स्टेट लाईट काय वेळेवर लागेनात गेली चार पाच दिवस मेढ्याचे रस्ते अंधारमय झालेले असून रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून चालावे लागत आहे .
स्थानिक नगर पंचायत प्रशासन काय या विषयाकडे लक्ष देत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत आहे . कंत्राटदारांच्या भोगस कामांमुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे नागरिकांमधून नाराजी व संताप व्यक्त होत आहे . लाखों रुपये खर्च करून सुद्धा दोन महिन्यांमध्ये जर अशी अवस्था होत असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मेढ्याचे काय होईल असा प्रश्न स्थानिक नागरिक भेडसावत आहे. . या अंधारामुळे चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे नागरिकांचे होत असलेले नुकसान याकडे लक्ष कोण देणार आणि या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष का करतं आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली जनतेला वेटीस धरण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा घोळ कधी सुटणार असे स्थानिक नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहेत .
मेढा नगरीतील तसेच शेजारील करंजे जवळवाडी नागरीक सायंकाळी स्टेट लाईच्या आधारावर शतपावली करण्यासाठी बाहेर पडत असतात. परंतु सध्या नगरीमध्ये अंधकार पसरला असल्याने शतपावली करणारांची संख्या घटलेली दिसत आहे. त्यामुळे प्रशासन लक्ष देणार की नाही का मेढ्यातील रस्ते असेच अंधारात राहणार.असा प्रश्न निर्माण झाला आहे.