सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज बाह्य महामार्गl बरोबरच पिसुर्टी ते निरl-शिव- तक्रार या जुन्या पालखी मार्गाचे रुंदीकरण आणि पिसुर्टी रेल्वे गेटवरील उड्डाणपूल तसेच इतर सर्व सोयी सुविधा एका वर्षात पूर्ण करू. असे आश्वासन मा. रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य. यांनी पालखी सोहळा नियोजन व समस्या निवारण पाहणी दरम्यान निरा येथे दिले.
पिसुर्टी ते निरा- शिव तक्रार या अपुऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था त्यामुळे वारंवार होणारे अपघात, तसेच पिसुर्टी रेल्वे गेटवर उड्डाणपूल नसल्याने याचा या रस्त्या लगतचे आणि आसपासचे गावाचे विकासावर होणारा परिणाम व होणारे नुकसान यासाठी रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाची आणि रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता याबाबत निरा शिव तक्रार ग्रामस्था तर्फे सरपंच सौ. तेजश्री काकडे, उपसरपंच श्री. राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनंत शिंदे, भाजपचे योगेंद्र उर्फ अण्णा माने, पवन देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्ते टी. के .जगताप यांनी समस्या मांडल्या व श्री. रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तेजश्री काकडे, सरपंच निरा शिव तक्रार आणि राजेश काकडे उपसरपंच यांनी त्यांचे स्वागत केले.