सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - प्रतिनिधी
पवारवाडी ता. जावली येथे मामाच्या गावी रहावयास आलेल्या सुरज प्रदिप शिंदे यास फोन करून खर्शी येथे बोलावुन घेवुन मित्रांनीच पुर्वीच्या भांडण राग धरून मारहाण केली. यामध्ये त्यास गंभिर स्वरूपाच मार लागल्याने पुणे येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची माहिती सुरजचे मामा सुरेश पवार यांनी दिली असून याबाबत मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्यातील विरमाडे ता. सातारा येथिल सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असुन दोघे फरार असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
सुरज शिंदे हा जांब गावचा रहिवाशी असुन तो आई व भाऊ यांचे सोबत मुंबई येथे वास्तव्यास आहे. सुरज हा काही कारणानिमित्ताने पवारवाडी येथे मामा सुरेश पवार यांच्याकडे राहण्यास आला होता. त्या दरम्यान त्यास मित्राचा फोन आला आणि तो खर्शी येथे गेला असता त्यास मित्रांनी मारहाण केली असल्याचे सुरजने सागीतल्याचे सुरेश पवार यांनी सांगितले.
दि. २९ रोजी तो सातारा सिव्हील येथे उपचारासाठी गेला होता त्यानंतर तो दि. ३१ रोजी पुन्हा सातारा येथे उपचारासाठी गेला असता त्यास उपचारार्थ अडमिट करण्यात आले होते. सातारा येथे उपचार होत नसल्याने त्यास पुण्याचे ससुन येथे पाठविण्यात आले परंतु त्याच्यात सुधारणा होत नसल्याने अखेरीस त्याचा दि. ८ रोजी मृत्यु झाला असल्याचे मामा सुरेश पवार रा. पवारवाडी यानी सांगीतले.
या घटनेबाबत मेढा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरज शिंदे हा ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी ॲडमिट होता. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये गणेश बजरंग सोनवणे, सुमित जालिंदर सोनवणे, प्रथमेश जयवंत सोनवणे, अभिषेक शिवाजी सोनवणे, प्रकाश शामराव पाटील, अक्षय कमलाकर सोनवणे सर्व रा. वीरमाडे, ता. वाई, जिल्हा सातारा यांना अटक केली असून मा. कोर्टा समोर हजर केले असता दि. 12 पर्यन्त पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तसेच अन्य दोन आरोपी कुणाल दिलीप गायकवाड , सुशांत उर्फ प्रणव सुनील सोनवणे यांचा शोध घेऊन त्यांना देखील या गुन्ह्यात अटक करीत असल्याचे सांगितले. प्रारंभीच्या तक्रारी वरून भादवी क 324, 323, 143, 147, 148,149, 504,506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या मध्ये वाढ होऊन ३०२ कलम लावण्यात आले असून गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष तासगावकर करीत आहेत.