जावली ! धनंजय गोरे ! आनेवाडी टोल नाक्यावरील मुजोर कर्मचाऱ्यांची टोलवरून वारकऱ्यांशी हुज्जत : तब्बल एक तास वारकऱ्यांची वाहने ठेवली अडवून

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली: प्रतिनिधी
पुणे बंगलूर आशियाई महामार्गवर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर आषाढी एकादशी निम्मित वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीच्या दिशेने पायी प्रवास करत असून या दिंडी च्या वाहनाना तब्ब्ल एक तास टोलसाठी टोल कर्म अधिकारी यांनी अडवून ठेवले,वारकऱ्यांच्या वाहनाना नेहमी टोल माफी दिली जाते मात्र तरीही येथील मुजोर अधिकाऱ्यांनी टोल नाकारल्याने  टोलनाक्यावर गोधळ निर्माण झाला  होता,
         जिल्ह्याचे सुपुत्र असेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना टोल माफी चा आदेश दिला असताना देखील आनेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांना टोल माफी साठी झगडावे लागत होते त्यामुळेच वारकरी आक्रमक बनले होते जवळपास दहा वाहने टोलवर तशीच उभी होती एक तास हा गोंधळ चालू होता, मुख्यमंत्री यांनी या वारकऱ्याच्या वाहणांना टोलवरून मोफत सोडण्याचे आदेश दिले तरीदेखील मुजोर अधिकारी आशा काही आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत,स्वतःची मनमानी करत आहेत, यावेळी वारकरी व टोलचे अधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी यावेळी तत्परतेने येथे धाव घेत,वाहतूक सुरुळीत करून वारकऱ्यांची वाहने सोडून दिली,या वेळी तात्यासो वासकर कोल्हापूर फड, आप्पासो वासकर, आजरेकर, देहुकर . ह भ प तुकाराम मांडवकर कोल्हापूर, विट्टल पाटील, आप्पसो वासकर फड, निवृत्ती महाराज,देहुकर  ही प्रमुख मंडळी यावेळी वारकऱ्यासोबत होती, यांना देखील या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.येथील स्थानिक नागरिकांना देखील या अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे नाहक मनस्ताप भोगावा लागत असतो,
      दरवेळी शासनाचे आदेश या टोल नाक्यावर पाळले जात नाहीत त्यामुळेच बऱ्याचदा याठिकाणी वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वादावादी होत असते, शासनाच्या आदेशाला या टोल वर कायम केराची टोपली दाखविली जाते
To Top