पुणे-सातारा सीमेवरून ! विजय लकडे ! पठाणशाह बाबा दर्ग्यावर काहींनी केली प्रार्थना तर काहींनी मागितली दुवा..! माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकडून दर्ग्याचे घेतले दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा/लोणंद 
विजय लकडे/प्रशांत ढावरे
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीेतील वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यासारख्या उपक्रमातून हिंदू मुस्लिम ऐक्य टिकेल, असा विश्वास पालखी सोहळा प्रमुख अँड.विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केला.
            निमित्त होते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाडेगाव (ता. खंडाळा) येथील 
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पठाणशाह बाबांच्या समाधीचे दर्शन ढगे पाटील यांनी घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हजारो वारकऱ्यांनी पठाणशाह बाबांचे दर्शन घेतले.
           पाडेगाव (ता. खंडाळा) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचे पंढरीच्या विठोबाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील बहुसंख्य वारकऱ्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी वारक-यांनी दर्गाहच्या निवा-यात काही वेळ विश्रांती घेेेेतली. दर्गाह कमिटीच्या वतीने हजारो वारक-यांना खाऊ वाटप  करण्यात आले.
            
    यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे पाटील, साताऱ्याचे माजी मंत्री तथा आ.बाळासाहेब पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आ.दिपक चव्हाण, पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन 
पवार,  पुणे जि.प.चे आरोग्याधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ.अभय तिडके, साताराचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.प्रमोद शिर्के , पुरंदरचे तालुका आरोग्याधिकारी डॉ.विक्रम काळे, राजेश खरात यांनी पठाणशाह बाबांचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांचा दर्गाह ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
           यावेळी हजरत पठाणशाह बाबा दर्गाहचे अध्यक्ष मुस्तफा आतार,  सचिव फिरोज सय्यद , विश्वस्त मोहम्मदगौस आतार यांच्यासह तसेच दर्गाह खिदमदगार कमिटीचे सिकंदर शेख, मन्सूर सय्यद,  मुस्तकीम आतार आदींनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------
To Top