सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठान यांच्याकडून रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्यातील शेकडोहून अधिक वारकऱ्यांना मोफत औषधाचे वाटप करून रुग्णवाहिकेची सेवा भोर ते पंढरपूर पर्यंत देवून सामाजिक सेवेला हातभार लावला आहे. आंबवडे येथील रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी ध्रुव प्रतिष्ठानने- एक डॉक्टर व दोन सहाय्यकांसह सुसज्ज कार्डीयाक रुग्णवाहिका तर विविध आजारांवरील औषधांचा संच दिला आहे. दर दोन दिवसाने दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.आषाढी व्दादशी पर्यंत ही सेवा दिली जाणार आहे.यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर,पांडुरंग महाराज किंद्रे, उपनगराध्यक्ष समीर सागळे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर,नगरसेवक गणेश पवार उपस्थित होते