सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा लोणंद येथे मुक्काम आहे. या मुक्कामामध्ये आरोग्य विभागामार्फत एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागामार्फत याठिकाणी 17 आरोग्य दूत पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच 21 आरोग्य पथके आणि प्रत्येक 1 कि.मी. वर एक रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली आहे. या तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पथकाने 286 वारकऱ्यांची तपासणी केली आहे. वैद्यकीय पथकाने 2 हजार 877, आरोग्य दुतांनी 452, आपला दवाखनामध्ये 41, 102 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 1 हजार 613 असे एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
यातपासणीमध्ये विविध अजारांच्या 4 हजार 944 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आरोग्य दुतांमार्फत वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच चालत असताना मार्गामध्येही तपासणी करण्यात येत आहे. तर आरोग्य पथकांमार्फतही पथक तैनाक करण्यात आलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. तसेच 102 रुग्णवाहिकेच्या माध्मयातूनही वारकऱ्यांची तपासणी केली जात आहे.
आरोग्य दुतांमार्फत दिंडी मधील वारकऱ्यांना तंबूमध्ये जाऊन आरोग्य माहिती पुस्तिका दिली. तसेच सर्व आरोग्य विषयी तक्रार असणाऱ्या माऊलीं ना औषध उपचार दिला. तर सकाळी सईबाई सोसायटी येथे सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यान सत्र घेण्यात आले.