सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून निरा येथील उच्चशिक्षित भावंडे महिंद्र झगडे व डॉ सतीश झगडे आपल्या आईचा वाढदिवस विविध प्रकारची 74 झाडे निरा पालखीतळ नीरा स्मशानभूमी दत्त घाट पाडेगाव आश्रम शाळेजवळील अंगणवाडी येथे लावून साजरा केला. गेली चार वर्षे ही भावंड काही विधायक काम करून आईचा वाढदिवस साजरा करतात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अरसौनिक अल्बमच्या 4000 बॉटल निरा व निरा परिसरात वाटल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अतिशय गरीब कुटुंबात किराणा किड्स वाटप करून वाढदिवस साजरा केला आश्रम शाळेला मदत करणे वृक्षारोपण अर्थात निसर्गसेवा करून साजरा केला.
या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी निरा प्रथम नागरिक तेजश्री काकडे माजी सभापती दत्ता चव्हाण उपसरपंच राजेश काकडे समता पतसंस्था चेअरमन दिलीप फरांदे अनिल चव्हाण दीपक काकडे गिरमे वकील हरिभाऊ जेधे अनंता शिंदे यांच्यासह निरा गावातील अनेक प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक याबरोबर महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. महेंद्र झगडे हे औरंगाबाद येथे सर्विस ला असून सतीश झगडे हे डॉक्टर असून निरा व निरा परिसरात सर्व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात.