सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा सुपे येथे एचपी कंपनीचा पेट्रोल पंप आहे. सदर सुपे पेट्रोल पंपास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पुणे विभाग पातळीवरील सन २०२२-२३ चा बेस्ट लुक ॲन्ड फिल आऊटलेट, पुणे रिटेल चा पुरस्कार मिळाला आहे. सदर पेट्रोल पंपावरील परिसर स्वच्छता, आवारातील सुविधा तसेच बेस्ट लुक यामुळे सदर पुस्कार मिळाला असल्याची माहिती सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.
समितीने सदर पेट्रोल पंपाची उभारणी सन २०२० मध्ये केली आहे. गतवर्षी सुद्धा सुपे पेट्रोल पंपास पुरस्कार मिळाला होता. पेट्रोल पंप सुरू केल्यापासुन समिती ग्राहकांना तत्पर व २४ तास सेवा आणि शुद्ध पेट्रोल व डिझेल देत आहे. ग्राहकांनी दिलेली साथ व विश्वास यामुळे समितीचे सेवक व कामगार वर्ग सेवा देत आहे. यापुढे ही समिती ग्राहकांसाठी सतत प्रयत्नशील राहील असा विश्वास समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी व्यक्त केला.