सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील दूध व्यवसायात अग्रेसर असलेले गाव वडगाव निंबाळकर येथील व्यापारी क्षेत्रामध्ये नावाजलेले, अतिशय हुशार व प्रामाणिक नंदू जाधव यांनी चक्क डीजे लावून गायची मिरवणूक काढली. पंचक्रोशीत नव्हे तर बारामती तालुक्यात गायीची विक्रमी रुपयाची विक्री केली आहे. ४२ लिटर दूध देणारी तिसरे वेत असणारी गाई चक्क २ लाख २१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली.
लासुर्णे गावचे दूध उत्पादक गवळी तुकाराम इंगळे यांनी या गाईची खरेदी केली आहे. या विक्रीमी गायीची विक्री ऐकून सर्वत्र चर्चा झाली आहे. सर्वांना फेटे बांधून डीजे लावून गाईची मिरवणूक काढण्यात आली.
------------------
दूध व्यवसाय करत असताना खात्रीशीर गाई देणे व चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे व्यवहार करणे तसेच शेतकऱ्यांचा फायदा होईल असा व्यवहार करणे हाच हेतू आहे. म्हूणन हा व्यवसाय करत आहे असे नंदू जाधव यांनी सांगितले आहे