सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल-शेंडकरवाडी येथील बारा जणांची कथा..शिक्षण तर पूर्ण झालं..पण नोकरीच लागत नाही..मंग चौकात बसल्या बसल्या १२ जणांना कल्पना सुचली..बचत गट सुरू करायचा ..केला..पैशाला पैसा लागत गेला..आज त्या बारा जणांनी बचत गटाच्या माध्यमातून १२ सर्कल नावाचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल सुरू केलं आहे.
सुरुवातीला अक्षय अंकुश गायकवाड, दिग्विजय कैलास मगर, दिनेश रामचंद्र शेंडकर, गायकवाड निशिराज अंकुश, आशिष संभाजी संपकाळ, संग्राम सतीश हुमे,
योगीराज कैलास मगर, गायकवाड अविराज लहुसिंग, अभिजित सुदाम पवार, अजिंक्य अनिल साळुंखे,
भुषण लव्हूसिंग गायकवाड व गणेश बाबुराव गायकवाड करंजेपुल व शेंडकरवाडी भागातील १२ जणांनी एकत्र येत मृत्युंजय नावाने बचत गट सुरू केला. या माध्यमातून सर्वानी दरमहा एक हजार रुपयांची बचत सुरू केली. त्यामधून साठलेले काही रक्कम व अजून त्या बारा जणांनी थोडी थोडी रक्कम जमा करून काल वाघळवाडी ता बारामती याठिकाणी १२ सर्कल नावाचे व्हेज व नॉनव्हेज हॉटेल सुरू केले आहे.त्याचे उदघाटन सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.