सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
बिगा नावाच्या शेतात एका 38 वर्षाची मतीमंद महिला शेतात शेळय़ा चारण्यासाठी गेली असता त्याच गावातील युवकाने तिच्यावर बलात्कार केला असून त्या प्रकरणी त्याच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वाईचे डीवायएसपी बाळकृष्ण भालचिम यांनी भेट दिली असून अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 38 वर्षाची महिला मतीमंद आहे. ती शेळया चारण्यासाठी डिसेंबर 2022 रोजी बिघा नावाच्या शेतात गेली होती. तेव्हा तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत गावातीलच युवकाने दोन दिवसांनी एकदा आणि पुन्हा दहा दिवसांनी दोनदा बलात्कार केल्याने ती 26 आठवडय़ाची गरोदर राहिल्यानंतर तिच्या आईने त्या युवकावर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा गुन्हा दाखल होताच घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी बाळकृष भालचिम यांनी भेट दिली. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून याचा तपास भुईज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भंडारे हे करत आहेत.