सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळ शहर व परिसरात लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील शिरोळ पंचायत समितीच्या आवारातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालून पूजा करण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच आवारातील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिरोळ नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक तातोबा पाटील प्रा अण्णासाहेब माने गावडे राजाराम कोळी एन वाय जाधव सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शहरातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा शासकीय निम शासकीय कार्यालय बँका पतसंस्था सेवा संस्था या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर मनोगते व्यक्त केली तर अनेक विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा पेहराव करून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले तर अनेक शाळेने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली या निमित्ताने विविध मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले शहरात व परिसरात सर्वत्रच राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली