सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर यांचे वतीने शिक्षण संस्थेच्या मुख्य शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साी यांचे ६४ व्या वाढदिवसानिमीत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन "सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23" चे आयोजन करणेत आलेले आहे.
सदर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन विभागामध्ये संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक २१/०७/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते ५.00 या वेळेमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभाग तर शनिवार दिनांक २२/०७/२०२३ रोजी महाविद्यालयीन विभाग अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार आहे. दिनांक २१/०७/२०२३ रोजी प्रमुख पाहुणे म्हणुन अनिल बागल, बि.डी.ओ. बारामती, तर दिनांक २२/०७/२०२३ रोजी डि. व्ही. जाधव, जॉईन्ट डायरेक्टर, डि.टी.ई. पुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेला आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागामधून राज्यभरातून २५० प्रकल्प तसेच महाविद्यालयीन विभागामधुन १०० अशा एकूण ४५० प्रकल्पांची नोंदणी आजपर्यंत झालेली आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विभागामधुन प्रत्येकी तीन क्रमांक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक रक्कम रुपये ८०००/-, द्वितीय क्रमांक रक्कम रुपये ६,०००/- तसेच तृतीय क्रमांक रक्कम रुपये ५,०००/- अशी बक्षिसे यशस्वी विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २२/०७/२०२३ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांना ६४ व्या वाढदिवसानिमीत्त श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर यांचे वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केक कापून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातुन भावी संशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत आलेले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. याप्रसंगी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देवकर उपस्थित होते.