Bhor News ! संतोष म्हस्के ! रिंगरोड भुसंपादन विरोधात शिवरे ग्रामस्थांचा एल्गार : आराखडा बदलला... ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 नियोजीत पुर्वीच्या आराखड्याप्रमाणेच रिंगरोड करावा. नव्याने बदल केलेल्या आराखड्या प्रमाणे शिवरे गावात भुसंपादन होऊ देणार नाही असा निर्धार करत शिवरे ता.भोर ग्रामस्थांनी रविवार दिं.९ पुणे - सातारा महामार्गावर पशुधनासह रास्ता रोको आंदोलन केले.
      ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. मात्र काही वेळाने आंदोलनात पोलिस अधिकारी व भोर तहसिलदार यांनी याबाबत निश्चित तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.रिंगरोडचा जुना आराखडा बदलुन नव्याने अधिसुचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये शिवरे गावामधील सुमारे 223 एकर बागायती क्षेत्र जात आहे हे नव्याने केलेले नियोजन त्वरीत बदलुन जुन्या आराखड्याप्रमाणे रिंगरोड व्हावा यासाठी शिवरे ग्रामस्थ आंदोलनात उतरले होते.अनेक दिवसंपासून विवध राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नेते, मंत्री यांच्याकडे ग्रामस्थ चकरा मारत आहेत.मात्र त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
    यावेळी सरपंच अमृता गायकवाड, उपसरपंच योगेश दळवी, माजी उपसरपंच माऊली डिंबळे, सूर्यकांत पायगुडे, कृष्णा डिंबळे, सोपान डिंबळे, निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, अतुल इंगुळकर, सुनील डिंबळे, पंढरीनाथ डिंबळे, तसेच रिगंरोड बाधित गराडे ता.पुरंदर गावातील काही ग्रामस्थ अँड. भास्कर जगदाळे तर  महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राम लथड, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तानाजी बर्डे, रेखा वाणी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते.
To Top