सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
साखरवाडी ! गणेश पवार
फलटण तालुक्यात नीरा उजवा कालव्याचे सिमेंट अस्तरीकरणाचे काम सुरू झाले असून त्याची सुरुवात तडवळे बंगला ते रावडी दरम्यानच्या 4 किलोमीटरने झाली आहे व टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सर्व कालव्याचे अस्तरीकरण होणार आहे सध्या निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने कंत्राटी ठेकेदाराने जलद गतीने या ठिकाणी काम सुरू केले असून या ठिकाणी रात्रंदिवस सुरू असलेल्या अजस्त्र मशनरी पाहून भविष्यात आपल्या विहिरी, बोअरवेल व पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी कुठून येणार या चिंतेने तालुक्यतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे
फलटण,खंडाळा,माळशिरस तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारा कालवा म्हणून निरा उजवा कालव्याकडे पाहिले जाते नीरा नदीवर असलेल्या वीर धरणातून हा कालवा सुरू होतो व पुढे माळशिरस पर्यंत जातो सुमारे १०० वर्षांहून अधिक काळापूर्वी इंग्रजांनी या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी या कालव्याची निर्मिती केली. हा कालवा ज्या ज्या भागातून जातो त्या त्या भागातील पाण्याची भूजल पातळी वाढुन शेतकऱ्यांच्या विहिरी व कुपनलिकांना पाझराद्वारे पाण्याची सोय होण्यासाठी त्याकाळी इंग्रजांनी या कालव्याची निर्मिती माती व मुरमामध्ये केली होती फलटण, खंडाळा, माळशिरस हे तालुके या कालव्याच्या निर्मिती आधी अवर्षणग्रस्त जिरायती म्हणूनच ओळखले जात होते मात्र हा कालवा या भागातून वाहल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागाला समृद्धी आली व जिरायती असणारे हजारो हेक्टर शेत जमिनी बागायती झाल्या आता मात्र सिमेंटच्या अस्तरीकरणानंतर ज्या शेतकऱ्यांचा पोट कालवा व लिफ्ट पाणी परवानगी नाही अशा शेतकऱ्यांनी कालव्यालगत लाखो रुपयांना जमिनीचे तुकडे घेऊन या ठिकाणी विहीर खोदून आपल्या जमिनीपर्यंत हजारो फूट लांब पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी नेहले आहे अशा शेतकऱ्यांच्या विहिरी अस्तरीकरणानंतर अस्तरीकरणानंतरनं कोरड्या पडण्याची भीती असून भविष्यात आपल्या जमिनी कशाच्या आधारावर पिकवायच्या असा प्रश्न या भागातील हजारो शेतकऱ्यांना पडला आहे
बारामती तालुक्यातील निरा डाव्या कालव्यावर मागील काही महिन्यांपूर्वी अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र तालुक्यातील सुमारे 18 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव जलसंपदा विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा व राजकीय पक्षांना पाठवून भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची तंबी दिल्यानंतर या ठिकाणचे अस्तरणीकरणाचे काम गेले सहा महिने झाले बंद असून ज्या पद्धतीने बारामती तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, संघटना एकवटल्या अशा संघटना व राजकीय पक्ष फलटण तालुक्यात एकवटून या अस्तरीकरणाला विरोध करणार का हा असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे .
COMMENTS