'सासुपायी वाटणी केली अन सासुच वाट्याला आली...' 'भाकरी फिरवायचं सोडा पिठाचा डबाच गायब...' राजकीय नाट्यावर नेटकऱ्यांचा असा विनोदी तडका ! आणि 'मतदान कार्ड विकणे आहे' असा गंभीर फटका !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
विशेष प्रतिनिधी : ॲड.गणेश आळंदीकर
            रविवारी दुपारी अचानक अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन थोड्याच वेळात सोशल मेडीया वर हास्य कल्लोळ करणारे तसेच उपरोधीक देखील विनोदी शैलीच्या प्रतिक्रिया उमटल्या....काही प्रतिक्रिया....
मतदान कार्ड विकणे आहे....

पहाटेचा शपथविधी अनेकांना पहायला मिळाला नव्हता म्हणून आज दादांनी रविवार सुट्टी चा दिवस निवडला अन वेळ ही दुपारची..

काकांनी भाकरी फिरवली पाहिजे म्हटले होते, पुतण्याने  तवाच उलथवला...

अजितदादा देवेंद्रवासी झाले..

विद्यार्थ्यांनो नोकऱ्या सोडा... चहा पकोडे विका...

अजितदादाच खरे हिंदुत्ववादी...

सत्तेत पण आम्हीच.. विरोधात पण आम्हीच... पवार पावर 

एकनाथ शिंदे साहेबांना उद्देशून..... काहीनी...सासूपायी वाटणी केली अन सासूच वाट्याला आली.. ....

साहेबांनी भाकरी फिरवली पण दादानी पिठाचा डबाच गायबा केला...

वकिली  क्षेत्रात देखील न्यायपालीकेवर चा ताण  दर्शवत... अरे देवा आत्ताच सुट्टी संपवून आलो होतो.... पुन्हा नवाब रोबीया.... सिंघवी... सिब्बल... आणी निवडणूक  आयोग... चिन्ह.... पक्षाची घटना....

गौतमी पाटीलला पण विधान परिषद वर घेऊन   सांस्कृतीक मंत्री करा...

काही ठिकाणी मोदी साहेब व राहुल गांधी एकत्र फोटो दाखवून.... आत्ता हे दोघे एकत्र आले कि डोळे मिटायला मोकळे...

काहीनी एकाच झाडाला फणसं, आंबा, केळी, पपई अशी फळे लगडलेली दाखवून राज्य सरकार हे नाव झाडाला दिले आहे...

आता या दोघानी एकत्र येऊन तिसऱ्या चा कार्यक्रम करू नये म्हणजे झाले...

पवारानी जे यशवंतराव चव्हाण यांचेशी केले तेच दादा नी त्यांचेशी केले.....

आज सुट्टी म्हटलं दुपारी मस्त झोपाव पण हे दुपार ची झोप मोडण बर नव्ह.....

 पाऊस पडलाय आता पुन्हा कामाख्या देवीला जाऊन काय झाडी काय डोंगर बघाव ...

आज सगळे राजकारण  पवारावर फिरतेय.... दादानी दाखवले भाकरी कशी फिरते.....

काहीनी पवार पावर म्हणत दादा सुप्रिया ताई व शरद पवार एकत्र दाखवले आहेत.....

तुका म्हणे उगी गप्प राहावे जेजे होईल ते शांतपणे पहावे... सत्ताकारण....

निवडणूक आयोगाला  विनंती.. पुढच्या वेळी आमच्या बोटाला शाई ऐवजी चुना लावावा....
काहीनी   इन्दू्रीकर महाराजाचे वाक्य स्टेटस ला ठेवले.. कार्यकर्ते जाम टेन्शन मधे आहेत ज्याला निवडून दिले ते गेलाय दुसऱ्या पक्षात.....

तीन वर्षात सगळे पक्ष सत्तेवर.... सेना...भाजप...कॉँग्रेस... राष्ट्रवादी... सगळे राजकारणी जनतेला मूर्ख  बनवण्यात यशस्वी झाले.....

गुगली बिगली  काय नाय सगळं गडी कोंड्यात....

कुणी फडणवीस यांना चाणक्य म्हटलंय तर कुणी राज ठाकरे चा डायलॉग.. राजकारणाचा चोथा  झालाय.... असे ठेवलेय...

         एकंदरीतच आजच्या शपथविधीने आलेले टोमणे व टीका  टिप्पणी हास्यांस्पद असली तरी बहुतांश ठिकाणी सत्यता लपलेली दिसते......
             
 
To Top