जावली ब्रेकिंग ! एकीव धबधब्याच्या जवळील दरीत कोसळून दोन युवकांचा मृत्यु : युवकांच्या दोन गटात झालेल्या भांडणात दरीत पडल्याची घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावली तालुक्यातील पर्यटकांच्या पावसाळी पर्यटनाचे ठिकाणी म्हणून प्रसिद्ध झालेल्या एकीव धबधब्याकडे युवक युवती यांचे सुट्टीच्या दिवसात कायम गर्दी असते, रविवारी देखील अशीच गर्दी पाहायला मिळाली, पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार एकीव धबधब्याच्या पासून जवळच असलेल्या कठड्या लगत रविवारी दोन युवकांच्या गटात भांडणे झाली . 
           या भांडणातून दोन युवक सुमारे 700 ते 800 फूट खोल असणाऱ्या दरीत खाली पडले.स्थानिक ग्रामस्थ व युवकांनी या घटनेची माहिती पोलीस व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहचून बचाव कार्य सुरु केले. यात दरीत खोलवर पडल्याने गंभीर जखमी झाल्याने अक्षय शामराव आंबवणे ( वय २८ रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) व गणेश फडतरे (वय ३५ रा. करंजे) या दोन युवकांचा मृत्यू झाला यातील अक्षय आंबवणे हा सातारा होमगार्ड मधे कार्यरत होता,तसेच गणेश फडतरे हा विवाहित असून सातारा मार्केट कमिटीत मधे नोकरीस होता 
             स्थानिकांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार सायंकाळी सहा च्या सुमारास युवकांच्यात भांडणे सुरु झाली याच भांडणात या युवकांचा दरीत पडून गंभीर रित्या जखमी झाल्याने मृत्यू झाला, या घटनेचे अनेक तर्क वितर्क लावले जात असून त्यांना ढकलून दिल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती कळताच मेढा पोलीस व सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ,व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम ट्रेकर्सनी बचाव कार्य सुरु केले. पावसाचा देखील अचानक वाढलेला जोर यामुळे शोध कार्यात अडथळे येत होते शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स टीमला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोघांना शोधण्यात यश आले. दोघेही दरीत अडकून पडले असल्याने गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
To Top