सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ: प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून प्रत्येक प्रभागात विकास कामासाठी समान निधी दिला त्यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न रस्ते गटारी व स्ट्रीट लाईट ही कामे पूर्ण होऊन शिरोळ शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे उर्वरित कालावधीमध्ये शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली
शिरोळ नगरपालिकेच्या वतीने येथील प्रभाग क्रमांक २ मधील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष पाटील बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अर्जुन काळे हे उपस्थित होते प्रभाग क्रमांक २ मध्ये ८४ लाख ६७ हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ पालिकेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला
यामध्ये गुरुलिंग नागजे घर ते गोविंदभाई पटेल घर गटर्स करणे ८ लाख १५ हजार रुपये, सुनिल पोळ घर ते कमल कांबळे घर रस्ता करणे ६लाख ३४ हजार रुपये, पोलीस कॉर्ट्स सुनिल कोळी घर सीडी वर्क गटर्स करणे १६ लाख ७२ हजार रुपये , आबा जाधव घर ते नामदेव माने घर गर्ट्स करणे १२ लाख २४ हजार रुपये ' आर्या जोशी घर ते बाबासो इंगवले व प्रकाश पाटील घर ते वसंत भोसले घर रस्ता करणे १९ लाख २२ हजार रुपये , पांडूरंग सुतार घर ते दिपक माने घर रस्ता व गटर्स करणे २२ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पुढे म्हणाले की शहरातील शिवस्वराज्यभवन बांधण्यासाठी ५ कोटी कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण यासाठी ५ कोटीचा निधी खर्च झाला आणखीन ४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे तसेच शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे यामुळे सध्या असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे यामुळे नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी साडेसत्तावीस कोटी रुपयाची सुधारित नळ पाणी योजना मंजूर झाली असून त्या कामाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले यावेळी उपनगराध्यक्ष सौ कुमुदिनी कांबळे नगरसेवक सर्वश्री प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी एन वाय जाधव बाजार समितीचे संचालक विजयसिंह देशमुख जनार्दन कांबळे सुरज कांबळे अमरसिंह शिंदे अण्णासो पुजारी दयानंद जाधव नायकू संकपाळ सुभाष माळी रावसाहेब पाटील सुनील पोळ दत्ता गावडे वसंत जाधव पांडुरंग सुतार दिलीप बिंदगे श्री खराडे श्रीकांत देशमाने दिलीप कलावंत श्री देशपांडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले अबीद गवंडी अभिजीत माळी दीपक शिंदे अभिजीत कोळी अक्षय माने रवी महात्मे साजिद मुल्लाणी स्वप्निल ढेरे सुमित देसाई यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेने प्रभागातील कामे पूर्ण केल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला,,,,