सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे )
महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यातील "कोतवाल" संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80% मर्यादीत पदे भरणेस मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांनी जावली तालुक्यातील रिक्त कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत करण्यासाठी आदेश दिले आहेत.
त्यानुसार जावली तालुक्यातील 16 पदे रिक्त असून मंजुर झालेल्या आरक्षणा नुसार मेढा, केळघर करहर, आनेवाडी, कुडाळ, बामणोली मंडला अंतर्गत येणाऱ्या गावच्या कोतवाल पदासाठी जावली उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बिभवी, दूंद,केळघर, आखाडे खर्शी बारामुरे,काटवली, कुडाळ, हुमगाव, सोमर्डी,सायगाव, सोनगाव, आलेवाडी, तेटली,आपटी, मुनावळे,कुसापूर या गावच्या रिक्त कोतवाल पदाचे आरक्षण शुक्रवारी 14/07/2023 रोजी दुपारी 3.00 वाजता पंचायत समिती जावली (मेढा) सभागृह येथे आयोजीत करणेत आले आहे. तरी वरील गांवच्या सर्व राजकिय समाजीक क्षेत्रातील ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी केले आहे