सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निरा येथील प्रसिद्ध व्यापारी शांतिकुमार वालचंद शहा (बाबुशेठ सराफ) यांचं दुःखद निधन झाले आहे. निरा क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, तसेच झंकार व्याख्यानमालेचे संस्थापक होत. वालचंद सराफ नावाने त्यांचा सोने चांदीची पेढी प्रसिद्ध आहे. माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांचे ते निष्ठावंत सहकारी होत. अंतिम संस्कार सकाळी ८:३० वाजता नीरा येथे होतील.