सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील वरंधा घाटमार्गे महाडकडे जाताना वारवंड - शिरगाव हद्दीतील घोडेमैदान वळणावर धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ३०० फूट खोल नीरा - देवघर धरणाच्या पाण्यात बलेनो एमएच१४एचडी ३९८४ कोसळली.गाडीत चार जन होते.त्यातील ३ जणांना जलसमाधी मिळाली तर एक जण बचावला असल्याची घटना शनिवार दि.२९ घडली.
बलेनो गाडीतून पुण्याहून वरंधा ता.भोर घाटमार्गे एका तरुणीसह तिघेजण कोकणात ट्रेकिंगसाठी जात होते.घाटातील शिरगाव-वारवंड हद्दीतून जात असताना तीव्र वळणावर धुक्याचा अंदाज न आल्याने तसेच चालकाचा गाडीवरील तोल सुटल्याने नीरा - देवघर धरण पात्रात गाडी कोसळली.यातून संकेत विरेश जोशी रा. बाणेर ( मूळ गाव गुजरात) हा तरुण गाडीतून बाहेर फेकला गेल्याने बचावला.तर अक्षय रमेश धाडे वय -२७ रा. रावेत,स्वप्निल परशुराम शिंदे (वय - २८) रा.हडपसर पुणे तर एक तरुणी हर्षप्रीत हरीप्रीतसिंग बांबा ( वय - ३०)पाषाण पुणे(जबलपूर) हे तिघेही गाडीत अडकल्यामुळेच मृत्युमुखी पडले.यातील स्वप्निल शिंदे बेपत्ता असून यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक ,सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर- पुणे,परि.पोलीस उपअधीक्षक रेखा वाणी, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,शिरगाव, वारवंड, कोंढरी येथील पोलिस पाटील व स्थानिक ग्रामस्थ,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव,पोलीस हवालदार दत्तात्रय खेंगरे,उद्धव गायकवाड,विकास लगस,अतुल मोरे,सादिक मुलाणी ,भीमराव रनखांबे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले.यात तरुणी हरीप्रित बांबा व तरुण अक्षय धाडे यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.