सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
मेढा - ओंकार साखरे
जावली तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथील नागरिकांनी दरडी कोसळण्याच्या अनुषंगाने स्वतः खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन तालुक्यातील नागरिकांना तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी केले आहे.
जावलीच्या डोंगराळ भागामध्ये गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे धोके निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भूजलनाचे निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आसपासच्या विहिरी अधिक काळ ओसंडून वाहत असतील तर दरड कोसळण्याची चाहूल समजावी जर अचानक अनेक झऱ्यांचे उगम आपल्याला आढळत असेल तर झऱ्याच्या प्रवाहामध्ये पाचपट वाढ झालेली दिसत असेल , झऱ्याच्या पाण्याचे तापमान हे नैसर्गिक तापमानापेक्षा साधारणता पाच अंश सेल्स पेक्षा जास्त भासत असेल तर धोक्याची घंटा समजावी. अतिवृष्टी मुळे झाडे विद्युत पोल, तारांची कुंपणे कलने तिरकी होणे इत्यादी लक्षणं दिसल्यास तसेच पक्षी व जनावरांच्या वर्तणुकीमध्ये अचानक बदल होणे, पक्षांनी वेगळा आवाज काढणे, पायाने जमीन उकरणे, सगळे पक्षी एकत्र जमणे घरातून जमिनीतून पाण्याचे पाजर उपळा फुटणे किंवा घरातील फरश्या उचकटणे जमिनीला नवीन ठिकाणी पाजर फुटणे नियमित येणाऱ्या झऱ्यातून अचानक गढूळ पाणी येणे भात खचर्यांना भेगा पडणे अशा प्रकारची लक्षणे अतिवृष्टीच्या काळात जाणवत असतील तर तेथील नागरिकांनी त्या ठिकाणाहून पाचशे मीटर दूर स्थलांतरित होणे आवश्यक आहे. अशा बाबी निदर्शनास आले असता तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात अशी माहिती जावलीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी संकेत ओळखणे व खबरदारी घेणे गरजेचे आहे महत्वाचे आहे.