भोर ब्रेकिंग ! संतोष म्हस्के ! भोर-मळे जाणारी एसटीला वाढाणे येथे अपघात : बस पलटी झाली....बसमध्ये ४० प्रवाशी होते...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील ३२ गाव खोऱ्यातील वाढाने ता.भोर येथे भोर वरून मळे याठिकाणी जाणारी गुरुवार दि.६ दुपारची एसटी बस साईड पट्टीवरून खचल्याने पलटी झाली.एसटी बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते.मात्र एसटी बस मधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप असून प्रवाशांच्या पुढील वाहतुकीसाठी दुसरी बस तात्काळ देण्यात आल्याचे  भोर आगार व्यवस्थापक प्रवीण बांद्रे यांनी सांगितले.
            सध्या तालुक्याच्या उत्तरेकडील भागात रिमझिम पाऊस सुरू असून जमीन ओली होऊन भुसभुशीत झालेली आहे.पुढून येणाऱ्या वाहनाला जाण्यासाठी जागा करीत असताना रस्त्याच्या साईड पट्टी वरून एसटी बस खचली गेली असे चालकाकडून सांगण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यांच्या साईड पट्ट्या भरीव करण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून होत आहे.
To Top