सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोरगावचे मनोहर तावरे, कार्याध्यक्षपदी सकाळचे कल्याण पाचंगणे तर सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर यांची बिनविरोध निवड पार पडली.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान येथे पत्रकार संघाचे वार्षिक सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष वसंत मोरे होते यावेळी जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर, अशोक वेदपाठाक, दत्ता माळशिकारे तसेच पत्रकार संतोष शेंडकर, नाविद पठाण, विजय मोरे, सोमनाथ भिले, युवराज खोमणे, दीपक जाधव, राजेश वाघ, हेमंत गडकरी, संतोष भोसले, सचिन वाघ, सचिन पवार, विजय लकडे, यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते, मागील सभेचे इतिवृत्त सचिव चिंतामणी क्षिरसागर वाचन केले.
यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्षपदी adv. गणेश आळंदीकर निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी एकूण पाच जणांना मागणी केल्यानुसार जेष्ठांनी विचार विनिमय करून सर्व पदांची निवड केली.
नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे------
अध्यक्ष - मनोहर तावरे
कार्याध्यक्ष ; कल्याण पंचांगणे
उपाध्यक्ष : ऋषीकेश काशिद, सुनील जाधव
सचिव : चिंतामणी क्षीरसागर
सह सचिव : समीर बनकर
खजिनदार : गोरख जाधव
सह खजिनदार : सोमनाथ लोणकर