सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील पाले ता.भोर गावचे आदर्श शिक्षक तसेच तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस सुरेश खोपडे यांची पुणे जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली.जिल्हा पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या मासिक सभेत तज्ञ संचालक पदासाठी सुरेश खोपडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध केल्याचे सभापती कविता खरात- कांबळे आणि मानद सचिव विकास गायकवाड यांनी सांगितले.
निवडी नंतर पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदिप जगताप,शिक्षक नेते संजय पवार, राजाभाऊ आतार ,भोर तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदे यांच्या हस्ते सुरेश खोपडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा पतसंस्थेचे नूतन उपसभापती संदिप रसाळ ,संचालक सचिन हंगरगे,दिलीप खुडे,प्रताप शिरसट,सचिन गायकवाड, निलेश रेणुसे ,चंद्रकांत भिसे, संपत आधवडे ,दिनेश दुधाळ ,मोहन कोलते ,माजी संचालक कुंडलिक कांबळे, शुभांगी खोपडे , राजश्री पवार,नितीन सलगरे,शुभम मस्तूद उपस्थित होते .
जिल्हा शिक्षक समितीच्या पतसंस्थेत सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी आग्रही राहून कामकाज करणार असल्याचे सुरेश खोपडे यांनी यावेळी सांगितले .
COMMENTS