सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द मार्गावरील खोमणे वस्ती येथे चारीवर पूल बांधण्यात आला परंतु नव्याने बांधण्यात आलेला पूल हा रस्त्याच्या खाली बांधला गेला व रस्त्याची उंची वर राहिली त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहे कामाचा दर्जा हा अतिशय नित्कृष्ट दर्जा असल्यामुळे कामाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
गावठाण भागातून पाणी ओढ्याला जाते गळूमकर वस्ती, खोमणे वस्ती या भागातील पाणी चारी नेओढ्याला जाते हे पाणी व्यवस्थित ओढ्याला जावे याकरिता चारीवर पूल बांधण्यात आला पुराचा धोका टाळावा म्हणून पुलाची उंची उंच असावी असे ग्रामस्थांची म्हणणे परंतु पुलाची उंची जमीनलगत केली गेली आहे. पुलाची उंची सुमारे तीन फूट उंचा असावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती यामुळे पाणी जाण्यास अडथळा येणार नाही पुलाची उंची कमी झाल्याने नागरिक वस्तीत पुराचे पाणी जाण्याचा धोका निर्माण होईल असे चिन्ह दिसत आहेत. यामुळे वडगाव निंबाळकर ग्रामस्थांनी ठेकेदाराशी बोलणी केल्याने ठेकेदाराने टोलवा -टोलेची उत्तरे दिली यामुळे नाराज ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यावर लवकरात -लवकर निर्णय घेऊन कामकाज दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
------------------------------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सार्वजनिक कामांना निधी मिळतो परंतु ठेकेदार व अधिकारी यांच्यामध्ये संगमत होत असून कामाचा दर्जा खालावत आहे, या संबंधित कामाचे लवकरात लवकर चौकशी व्हावी व कामाचा दर्जा सुधारावा व कामकाजात बदल करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
सुनील ढोले- सरपंच वडगाव निंबाळकर( ता.बारामती )