सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पाडेगाव (ता. फलटण ) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचा ३९ वा उरूस तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऊरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहच्या ऊरूसानिमित्त गुरूवारी (दि.६ ) सायंकाळी दर्गाह स्थळापासून निरा गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री सव्वा दहा वाजता
हजरत पठाणशाह बाबांच्या समाधीला धार्मिक विधिवत संदल लावण्यात आला.
शुक्रवारी ( दि. ७) ऊरूसाचा मुख्य दिवस असल्याने बाबांच्या दर्शनासाठी नीरा, पाडेगाव, निंबुत, लोणंद, बारामती परिसरासह पुण्याहून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
रात्री दहा वाजता मिलादख्वाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजता कुराण पठण करण्यात आले. सकाळी ११ वाजता जियारतचा धार्मिक विधी पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर ऊरूसाची सांगता करण्यात आली.
यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे, बाळासाहेब ननवरे, अँड.पृथ्वीराज चव्हाण, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर , पाडेगांवचे माजी सरपंच हरिश्चंद्र माने, भगवान माने, गजानन माने, रविंद्र मर्दाने आदींसह बहुसंख्य भाविकांनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पाडेगांवचे माजी सरपंच विजयराव धायगुडे यांची खंडाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार, उपाध्यक्ष रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद, विश्वस्त मोहंम्मदगौस आतार, इकबाल मुल्ला यांच्यासह दर्गाह खिदमतगार कमिटीचे मन्सुर सय्यद, सिकंदर शेख, हाजी रज्जाकभाई बागवान, आरीफ तांबोळी, नसरूद्दीन शेख, नदीम सय्यद, जमीर सय्यद,
युन्नूस बागवान, निहाल आतार, शमशेर शेख, निजामुद्दीन शेख, जलील शेख , रियाज पठाण,
मोहसीन आतार आदींसह बहुसंख्य तरूणांनी विशेष परिश्रम घेतले.
-
COMMENTS