बारामती ! घराला जायला रस्ताच नसल्याने उपोषणाला बसलेल्या इनामदार कुटुंबाला मिळणार रस्ता : मुरूम ग्रामपंचायतने दिले आश्वासन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम(ता. बारामती) ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर येथील इनामदार कुटुंबाने रस्ता मिळावा यासाठी सोमवार(दि.१०) सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित केले. मुरुमचे रहिवाशी रशीद इनामदार यांना स्वतःच्या घरात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने आणि गेल्या दोन वर्षापासून शासन दरबारी अर्ज करून आणि प्रशासनाचे दरवाजे ठोठवूनही रस्ताच मिळत नसल्याने रशीद इनामदार व त्यांचे कुटूंबातील सदस्य यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. 
          ग्रामविकास अधिकारी शहाजहान बाणदार तसेच वडगाव निंबाळकरचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी उपोषणस्थळी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांनीही या उपोषणाला आपला पाठिंबा दिला होता. 
            इनामदार हे गेल्या सत्तर वर्षांपासून मुरूम येथील रहिवाशी आहेत या अगोदर त्यांना येण्या-  जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता होता. सदर रस्ता अडविण्यात आल्याने रशीद इनामदार यांना त्यांच्याच घरात जाण्या-येण्यास अडचण निर्माण झाली आहे.  बारामतीचे प्रशासन त्यांना रस्ता देण्यास असमर्थ ठरल्याने अखेर रशीद इनामदार यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. याबाबत रशीद इनामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामपंचायत मुरुम, बारामतीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना रस्ता मिळावा यासाठी निवेदन दिले आहे. मुरुम ग्रामस्थांनीही सह्या करून इनामदार यांना रस्ता मिळावा म्हणून पाठिंबा दिला आहे. येथील अतिक्रमण काढावे यासाठी तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले होते. गटविकास अधिकारी यांनी संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले होते मात्र गावठाण जागेची मोजणी झाली नव्हती.
ग्रामपंचायतीने गावठाण मोजून येथील अतिक्रमण काढून रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर इनामदार यांनी आपले उपोषण स्थगित केले.

To Top