Bhor News ! भोर-शिंदेवाडी (शिरवळ) येथील अपघातात भोरचे २ युवक गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- शिंदेवाडी(शिरवळ) मार्गावरील नवलाई हॉटेल शेजारी मंगळवार दि.११ सकाळी सातच्या दरम्यान झालेल्या अपघातात पाले ता.भोर येथील ओंकार  कडेकर तर भोर शहरातील सुयोग धुमाळ असे २ तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून भोर येथील तरुण अतीगंभीर असल्याने त्यास पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
    दोन्ही तरुण शिरवळ येथील एसीजी फार्मा कंपनीत कामासाठी भोरवरून शिरवळकडे जात असताना शिंदेवाडीकडून भोरकडे येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकी स्वरांना नवलाई हॉटेल शेजारी समोरून धडक दिल्याने मोठा अपघात झाला.अपघातात दोन्ही तरुण जखमी झाले असून सुयोग धुमाळ यास गंभीर इजा झाल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
To Top