बारामती ! महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण लंपास : होळ येथील ढगाई देवी मंदिरातील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथील ढगाई देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
             शिला संजय पवार रा. वडगाव निंबाळकर यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पवार ह्या सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगाई देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे अडीच तोळ्याच्या मिनी गंठणवर डल्ला मारला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.
To Top