बारामती ! ॲड गणेश आळंदीकर ! डॉ. मुथांनी दिले चार वर्षाच्या मुलाला जीवदान : किचकट शस्त्रक्रिया करीत काढली घशात अडकलेली अंगठी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील ॲड अभिजीत खटावकर यांच्या चार वर्षाचा मुलगा रुद्र हा घरात खेळत असताना त्याने छोटीशी अंगठी गिळली. घरच्यांच्या बाब लक्षात येताच त्यानी बारामती येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ मुथा यांचेकडे नेले. 
         घशात काहीतरी अडकले यांची शंका येताव्ह डॉक्टर मुथा यानी एक्स रे द्वारे त्याची तपासणी केली .सदरची अंगठी अन्ननलिका व श्वासनलिकाच्या वरच्या भागात अडकली असल्याचे लक्षात येताच त्यानी भुलतज्ञ अमर पवार ,डॉ सौरभ निंबाळकर ,डॉ सौरभ मुथा यांचे मदतीने ऑपरेशन ला सुरुवात केली अतिशय बाळ लहान असल्याने व श्वासनलिकेला धक्का लागल्यास जीवाला धोका निर्माण झाला होता मात्र अतिशय कौशल्याने डॉ  राजेंद्र मुथा यांच्या टीम ने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली .
       डॉक्टर राजेंद्र मुथा यानी या अगोदर देखील अनेक महत्वपुर्ण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत.आजची शस्त्रक्रिया देखील किचकट होती . बारामती करांसाठीच नव्हे तर जिल्ह्यातुन येणा-या रुग्णासाठी डॉ मुथा देवदुत च बनले असल्याची भावना यावेळी वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव रासकर यानी व्यक्त केले. आज  वकिल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ॲड उमेश  काळे ,ॲड ज्ञानदेव रासकर ,ॲड खटावकर व सर्व सदस्यानी त्यांचा सत्कार केला .
To Top