बारामती ! समता पतसंस्था व दिलीप फरांदे यांच्यावतीने निंबुत ग्रामपंचायतीस स्वर्गरथ शववाहिकेचे लोकार्पण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा (ता.पुरंदर) येथील समता नागरी सह.पतसंस्था व कै.प्रभाकर रामा फरांदे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने निंबुत ग्रामपंचयातीला सुमारे अकरा लाख रूपये खर्चून स्वर्ग रथ ही शववाहिका लोकार्पण केली. 
        दि.१२ कै.प्रभाकर रामा फरांदे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वर्ग रथाचे निंबुत ग्रामपंचायतीकडे लोकार्पण करण्यात आले. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते स्वर्ग रथाचे पुजन करून त्याच्या चाव्या निंबुत ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. हा स्वर्ग रथ अहमदनगर येथील श्रीगोंदा  येथून बनविण्यात आला असून स्वर्ग रथ निंबुत ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आला असल्याचे समता पतसंस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
     यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,  जि.प.चे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर मा. अध्यक्ष शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, बाळासाहेब ननवरे, राजेश चव्हाण, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, सुनिल भगत, संग्राम सोरटे, विजयकुमार सोरटे, सुनिल भोसले, यांच्यासह समता सह. पतसंस्थेचे चेअरमन दिलीप फरांदे , व्हा.चेअरमन उत्तमराव आगवणे, संचालक राजेंद्र जैन, राजन शहा, मत्तल चव्हाण, मनोज शहा, पोपटराव धायगुडे , सचिव युवराज फरांदे, व्यवस्थापक  राहुल ढोले आदी उपस्थित होते.
----------------------------------------------
 निंबुत हे मोठे आणि विस्तारलेले गाव असून गावठाणात नीरा नदीकाठी स्मशानभूमी आहे. गावठाणापासून फरांदेवस्ती, निंबुत छप्री, काकडे वस्ती, फरांदेवस्ती दीड ते दोन किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे मयत खांद्यावरून वाहून नेणे खान्देकरी लोकांना जिकीरीचे होत होते. यावर फरांदे यांनी मोलाचे काम करत कायमचा तोडगा काढला आहे.
To Top