शिरोळ ! नगरपालिकेच्या वतीने ४० कोटीची विकासकामे सुरू : नगराध्यक्ष अमरसिंह पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरोळ : चंद्रकांत भाट
राजश्री शाहू विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाच्या विविध योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्या आठवड्यात शहरात ४० लाखाची विकास कामांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दिली. 
              येथील प्रभाग क्रमांक तीन मधील विविध विकास कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते व पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सरपंच अर्जुन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रभागातील बाळासाहेब माने मंडळ ते ढाले सायकल दुकान पर्यंत गटर्स करणे ९ लाख ३२ हजार गणेश शिरोळकर ते महावीर कांबळे गटर्स करणे ६ लाख ४४ हजार शेवंता बनसोडे ते राकेश खातेदार घर रस्ता करणे ७ लाख ३१ हजार विलास शिरोळकर ते कोंडीबा कांबळे घर गटर्स करणे १२ लाख ७ हजार अंगणवाडी ते जुगनू कांबळे घर रस्ता करणे११ लाख २० हजार काशिनाथ पुजारी घर ते सागर पुजारी घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २ लाख ४८ हजार शेवंता बनसोडे ते राकेश खातेदार घरापर्यंत रस्ता करणे १२ लाख ९२ हजार आशा ६२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालिकेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व नेतेमंडळी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना शासनाच्या विविध योजनेतून निधी मिळवत विकास कामे पूर्ण करण्यात आली गेल्या पाच वर्षात १५० कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आले असून या आठवड्यात आणखीन ४० कोटी रुपयांची विकास कामे सुरू होणार आहेत तर कोट्यावधी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत साडे सत्तावीस कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे लवकरच सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे
यावेळी उपनगराध्यक्ष सौ कुमुदिनी कांबळे नगरसेवक प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी एन वाय जाधव बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे सुरेश कांबळे अमरसिंह शिंदे अण्णासो पुजारी सुभाष माळी रावसाहेब पाटील सुशांत कांबळे अमोल मोहिते अशोकराव कांबळे चिदानंद कांबळे उत्तम देवमाने राहुल जाधव कॉन्ट्रॅक्टर अबीद गवंडी अभिजीत कोळी दीपक शिंदे लक्ष्मण भोसले  अभिजीत माळी अक्षय माने रवी महात्मे यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेने प्रभागातील कामे पूर्ण केल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला
To Top