सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
सावली ग्रामस्थांनी स्तुत्य उपक्रम राबवित आज रविवारी सकाळी गटारी अमावस्याला गावातील गटारे आणि परिसरातील स्वच्छता करून आपला स्वच्छतेचा संदेश देणारी आगळी वेगळी गटारी साजरी केली .त्यामुळे सावली ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामपंचायतील दिलेल्या स्वच्छतेच्या विकासाबाबतच्या पत्राला प्रतिसाद देत मुख्याधिकारी खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा जागर सावली येथे प्रत्येक रविवारी सकाळी तीन तास सुरु करण्यात आलेला आहे .
चार जुलै पासून दर रविवारी सकाळी तीन तास आणि प्रत्येक मंगळवारी गावातील ग्रामस्थांनी स्वयं स्फूर्तीतून आपापला परिसर स्वच्छ करायचा असा निर्णय बैठकीमध्ये घेवून या प्रमाणे हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाला हळूहळू प्रतिसाद ग्रामस्थांम कडून वाढत आहे .हे स्वच्छता अभियान गावच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यासाठी आणि स्वच्छ आणि सुंदर सावलीसाठी राबविण्यात येत असून ही स्वच्छतेची चळवळ लोक चळवळ करण्यासाठी गावातील प्रत्येकाला याबाबत जनजागृती करून स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे . त्यामुळे यामध्ये हळूहळू सर्वांचा सहभाग वाढत असून रविवार आणि मंगळवार स्वच्छतेचा वार म्हणून त्याची ओळख होत आहे .
आज सकाळी गावतील शाहूनगरमध्ये गटारे आणि रस्ता परीसरातील स्वच्छता करण्यात आली . यामध्ये गावचे सरपंच विजय सपकाळ, अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश कांबळे, प्रकाश जुनघरे, पोलिस पाटील संजय कांबळे, सखाराम कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र जुनघरे, संगीता कांबळे ,रेश्मा कांबळे , विजय कांबळे, आनंदा कांबळे, ज्योती कांबळे, सुनंदा कांबळे, जमुना कांबळे ,आदी मोठया संख्येने सहभागी होते .
दर रविवारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक ,कर्मचारी गावातील एका वॉडमध्ये जावून तेथील ग्रामस्थांना एकत्र करून टप्या टप्यात स्वच्छता केली जाते. यापुर्वी गावातील गटारे व परीसरातील स्वच्छता करण्यात आली असून प्लॅस्टीकही एकत्र गोळा करण्यात येत आहे. स्वच्छतेचे हे श्रमदान लोकचळवळीचे अभियान करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यास ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभत आहे . यावेळी सरपंच विजय सपकाळ यांनी दिप अमावस्या च्या शुभेच्छा देताना सांगीतले की सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान आरोग्य ऐश्वर्य शांती व सौभाग्याचा प्रकाश आपल्या जीवनात अविरत प्राप्त हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थनाआणि सर्व ग्रामस्थांना याच दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा .
-----------------------
स्वच्छतेचा विकास झाला तरच गावांत आरोग्य सुख शांती लाभेल . म्हणूनच आम्ही जिल्हापरीषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या सुचनापत्राच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा जागर सुरु केला असून त्यांस लोहसहभाग मिळत आहे . त्यातूनच स्वच्छ आणि सुंदर आरोग्यदायी सावली होणार आहे.