मराठी पत्रकार परिषदच्या राज्य सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे : मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे बैठकीत घोषणा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या राज्य सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर येथील क्रुषी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले बैठकीत  परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी निगडे  यांची नियुक्ती केली. 
         मराठी पत्रकार परिषदेच्या बैठकीचे आयोजन रविवारी (दि. १६) केले होते. मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, रज्यभरातील ३६ जिल्ह्याचे अध्यक्ष, सचिव व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची उपस्थित  होती. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राज्य अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद  अष्टिवकर, सचिव मणसूरभाई सय्यद, जानवी पाटील, विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, निवडणूक  प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कर्जत जिल्हा अहमदनगरचे संदिप कुलकर्णी तर, सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांच्या नावाची घोषणा परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली. निगडे यांचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, प्रविण शिर्के, पुरंदर तालुका अध्यक्ष योगेश कामथे, बारामतीचे अध्यक्ष हेमंत गडकरी, निरीक्षणे अध्यक्ष संजय भाराते, आळंदीचे अर्जून मेदनकर, हवेलीची अध्यक्ष रमेश निकाळजे, लोणावळ्याचे अध्यक्ष संजय पाटील, श्रावणी कमत, अमोल बनकर, निलेश भुजबळ, मंगेश गायकवाड, ए. टी. माने, स्वप्नील कांबळे, छाया नानगूडे, चंद्रकांत झगडे यांसह पुणे जिल्ह्यातील पत्रकारांनी निगडे यांचे अभिनंदन केले.
To Top