Wai Breaking ! गाडी पार्किंग वरून झाला वाद : कोकणातील भाविकांच्या बसवर स्थानिकांच्या दगडफेकीत भाविक जखमी

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वाई : प्रतिनिधी
वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या पर्यटकांच्या बसवर आज सायंकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून स्थानिकांशी वाद झाल्याने परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली.
          त्यामुळे महागणपती पुलावर नाना नानी पार्कजवळ  रस्त्यावर काचांचा ढीग साठला होता. या दगड फेकीमध्ये काही पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे, हे भाविक कोकणातील असून गणपतीचे दर्शन घेवून ते मांढरदेवीच्या दर्शनाला गेल्याने याबाबत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. परंतु तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पोलिसांची पंचायत झाली आहे. त्याच परिसरातील काही लोकांची पर्यटकां बरोबर वादावादी झाली. त्यानंतर त्या लोकांनी खाजगी बसच्या दगडफेक करून काचा फोडल्या. अशी वादावादी सध्या दररोज या परिसरात सुरू आहे. रोज नवनवे उद्योग केले जात आहेत. अशा उद्योग करणाऱ्या लोकांमुळे स्थानिक नागरिक व महागणपतीच्या दर्शनाला मह्राष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच शहराच्या मध्यवस्तीत रहिवाशांना व व्यापाऱ्यांना सध्या दररोज त्रास सुरू आहेतच. ते आणखी वाढणार हे नक्की. दगड फेक करणार्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
To Top