सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरोळ : प्रतिनिधी
जिद्द आणि कठोर परिश्रम घेऊन कु निवेदिता अमरसिंह शिंदे हिने मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून शिरोळ शहराचे नाव मोठे केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोदगार प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी काढले
मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बारा वर्षे वयोगटात झालेल्या स्पर्धेत निवेदिता अमरसिंह शिंदे हिने सुवर्णपदक पटकावून शिरोळचा नावलौकिक केला याबद्दल शिरोळ नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी निवेदिता शिंदे हिचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते
या समारंभास माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सौ कमलाबाई शिंदे तातोबा पाटील कृष्णराव शिंदे चंद्रशेखर पाटील( बारवाडकर) सचिन उर्फ राजू कुऱ्हाडे चंद्रकांत भाट बाळासाहेब कांबळे स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील सौ स्नेहल शिंदे वैशाली पवार, भाग्यश्री बल्लारी, अश्विनी माळी, वर्षा खडके, माला खडके कमल खडके, विजया कल्लणवर, शांताबाई कांबळे, उज्वला आवळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते