सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
बारामतीच्या पश्चिम भागात आता पोलीस प्रशासनाचे कामकाज गतिमान होणार आहे.यासाठी कारणही तसंच काही खास आहे. 'सुपा' येथील बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत सध्या हे कामकाज सुरू करण्यात आलय. या पोलीस चौकीचे लवकरच पोलिस ठाण्यात रूपांतर होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागात सर्वात मोठे कार्यक्षेत्र म्हणून वडगाव - निंबाळकर हे पोलीस स्टेशन परिचित आहे. या पोलीस ठाण्याचे विभाजन करून नव्याने 'सुपा' येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन प्रस्तावित आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची येथे भव्य इमारत बांधण्यात आलीय.
या परिसरातील सुमारे एकूण ६१ गावांचा संपूर्ण कारभार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एकाच ठिकाणी होता. यापैकी सध्या 23 गावांसाठी सुपा हे पोलीस स्टेशन मध्यवर्ती ठरणार आहे. येथील पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर होणार यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या पोलीस बलसंख्या अपूर्वा इमारतीत अजून प्राथमिक सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. सुमारे दहा हजार स्क्वेअर फुट आकाराची ही नवीन भव्य इमारत आहे.
सध्या राज्यातील काही रोल मॉडेल शासकीय इमारतींपैकीच 'सुपा' पोलीस ठाण्याची इमारत आहे. संपूर्ण वास्तु आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलीय. आगामी कालखंडात ऐतिहासिक परगाना म्हणून सुपे तालुका जाहीर होऊ शकतो. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दृष्टीने ठेवून पोलीस ठाण्याची इमारत तसेच बाजार समिती , उप ग्रामीण रुग्णालय इमारतींचे नियोजन केले आहे.