सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मु. सा. काकडे महाविद्यालयात कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग मार्फत आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. प्रशांत अरविंद शेंडकर (अध्यक्ष, सैनिक कल्याण संघ, बारामती) व श्री. विजयकुमार बंडोबा गोलांडे (कोषाध्यक्ष, सैनिक कल्याण संघ, बारामती) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आदिनाथ लोंढे यांनी केले.मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणारे अमर बलिदान करणार्याि सैनिकांच्या त्यागाची आठवण कायम हृदयामध्ये जिवंत ठेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून त्याच हेतूने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे संगितले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.राहुल गोलांडे यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थित वक्त्यांचे स्वागत केले आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवाद ही एक अशी गोष्ट आहे ज्या साठी व्यक्ती मरायलाही तयार होते. राष्ट्राभिमानवरच राष्ट्राचे यश अवलंबून असून प्रत्येक सैनिक हा प्राणपणाने सीमेवर लढत असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष रणांगणावर लढणारे, स्वानुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करत असून विद्यार्थ्याना प्रेरणा मिळवून देणे हा कार्यक्रमाचा हेतू असल्याचे संगितले.
श्री. प्रशांत शेंडकर यांनी कारगिल युद्धातील तत्कालीन भौगोलिक व राजकीय परिस्थिती स्पष्ट करत कारगिल युद्धामध्ये परमवीर चक्र मिळवणारे कॅप्टन विक्रम बत्रा, योगेंद्र यादव यांच्या कामगिरीचे कथन करत असताना विविध उदाहरणे सांगत भारतीय जवानांच्या शौर्याची व त्यागाची यशोगाथा सांगितली. तोलोलिंग शिखर व टायगर हिल पादाक्रांत करताना केलेली प्रयत्नांची शिकस्त रोमांचकारी पद्धतीने सांगितले तसेच ऑपरेशन सफेद सागर व ऑपरेशन तलवार याची माहिती दिली.
विजकुमार गोलांडे यांनी फौजी हा हुकूमाचा ताबेदार असल्याचे सांगत विद्यार्थी आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चय करून कोणतेही कार्य पूर्ण करू शकतो हा विश्वास व्यक्त केला. त्यांनी अग्नीवीर योजनेची माहिती सांगत विद्यार्थ्यानी हा देश माझा आहे. हा वसा घेऊन मोठ्या प्रमाणात लष्करी सेवेत भरती होण्याचे आवाहन केले. श्री. समीर शिंदे यांनी विद्यार्थ्याना २४ व्या कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव सतिश लकडे , उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, प्रा. रजनीकांत गायकवाड, डॉ.राहुल खरात , उपस्थित होते. त्याच प्रमाणे प्राध्यापक वर्ग प्रा. ए . एस . शिंदे, डॉ. निलेश आढाव, प्रा. पी. वाय. जाधव, प्रा. संतोष शेळके, प्रा. आकाश वाघमारे, प्रा. कुलदीप वाघमारे, प्रा. रणजीत कुंभार, प्रा. सचिन भोसले,प्रा.अनिकेत भोसले
प्रा. निलम देवकाते उपस्थित होते.
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रा. डॉ. कल्याणी जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशश्वी रित्या संपन्न झाला.