सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे )
जावळी तालुक्यात शिष्यवृत्तीचा पॅटर्न कायम असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्यादृष्टीने येथील शिक्षक कायमच प्रयत्नशील असतात.यादृष्टीने जिल्हा परिषद मेढा शाळा कायमच अग्रेसर ठरली आहे.सन २०२२-२३ च्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तेजस्विनी बेंद्रे ही राज्यात दुसरी तर ओम केंजळे हा राज्यात नववा आला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का माने राज्यात १६वी व तनिष्का गाडवे ही राज्यात २२वी आली आहे. शाळेतील १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून मेढा शाळेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
जिल्हा गुणवत्ता यादीत आसावरी आरुडे,ईश्वरी मेघाणे,विनय पवार,वेदिका जवळ, समृद्धी धायगुडे,आशिष यादव या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यांना शिल्पा फरांदे , पूनम कदम निवृत्ती धनावडे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अंजली सचिन केंजळे,मयुरी बाबुराव पवार,इंद्रनिल राजेंद्र पोळ, राजकिरण बालाजी बोथिंगे जिल्हा यादीत स्थान पटकावले आहे.या विद्यार्थ्यांना संजय आटाळे, समीर आगलावे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्ताराधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अलका संकपाळ, मुख्याध्यापक हणमंत धनावडे, माजी मुख्याध्यापक सुरेश शेलार,सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य , ग्रामस्थ मेढा आदींनी अभिनंदन केले.