सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विद्यार्थ्यांची जडणघडण होण्याचे एकमेव केंद्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा असून शाळांमध्ये बौद्धिक,शारीरिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व सुसंस्कृत बनविले जात असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षण आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे यांनी केले.
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील आंबाडे व खानापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने विद्यार्थी,विद्यार्थिनींना वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी नेरे ता.भोर येथे स्वरूपा थोपटे गुरुवार दिं.१३ बोलत होत्या.२ केंद्रामधिल २६ शाळांमध्ये १ हजार ५६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच अशा ७ हजार ८०० वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी राजगड संचालक उत्तम थोपटे, तालुका महिलाध्यक्षा गितांजली शेटे, युवा उद्योजक अनिल सावले,बाजार समिती संचालक राजाराम तुपे,राजेंद्र शेटे, खरेदी विक्री संघ सभापती अतुल किंद्रे,संचालक संपत दरेकर,मधुकर कानडे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद थोपटे,आनंदा बढे,मुख्याध्यापक धालपे ,उपशिक्षक रांजणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.