सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
अभ्यासाचे धडे शिकवता शिकवता सामाजिक बांधिलकी जपत आंबाडे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडी खुर्द ता.भोर चे आदर्श शिक्षक तसेच भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती बापू तुकाराम जेधे ( गुरुजी) यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांना स्पोर्ट्सचे ड्रेस व शैक्षणिक साहित्य वाटप केले.गुरुजींच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
आंतरप्रेरणेने प्रभावित होऊन दुर्मिळ होत चाललेली सामाजिक दायित्वाची भावना जोपासणारे केवळ आणि केवळ आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून लाभावी या प्रामाणिक उद्देश उराशी बाळगून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे बापू जेधे यांनी सांगितले.शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्पोर्ट ड्रेस तर परिसरातील जि.प.शाळा, वरोडी डाय,वरोडी बु.धनावडेवाडी-शेरताटी व पाले येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.या बरोबरच मुख्याध्यापक संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.यावेळी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयवंत वरे, संदीप घाडगे ,रवींद्र थोपटे ,अनिल महांगरे,रुपाली कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS