बारामती ! चांगला पाऊस पडू दे...ओढे नाले तुडुंब भरू दे...! हर हर महादेवाच्या जयघोषात 'सोमेश्वर'ला साकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात पङलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे  बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे जलअभिषेक व पाकाळणी करून साद घालण्यात आली. 
      या वर्षी चांगला पाऊस पङूदे, ओढे नाले तुङूंब भरूदे हर हर महादेवच्या जयघोषात देवाला साकङे घालण्यात आले. दुपारी १२ वाजता करंजेपूल गावचे व्यवसायिक सचिन फर्टिलायझर (समिर शहा) यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. सोमेश्वर सेवा भावी संस्थेच्या विनंतीला मान देऊन आज सोमेश्वर देवस्थान ची पाकळणी करण्यात आली.संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ धुवून घेतला.शिखरावर पाणी घालण्यात आले.परिसरातून सोमेश्वर भक्तांनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले. सोमेश्वर पंचक्रोशीतील निष्ठावंत भक्त संतोष कोंढाळकर, कैलास मगर, यादवराव शिंदे, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे, महेंद्र शेंङकर, महेंद्र गायकवाड, अनिल हूंबरे, पांडूरंग हूंबरे ,महेश भांङवलकर, शिवाजी शेंङकर, सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, लोकेश शेंङकर, जालिंदर शेंङकर जितेंद्र काकङे आदि उपस्थित होते.सर्वांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आले.
To Top