भोर ! संतोष म्हस्के ! अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील भरतीला स्थगिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३  आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा दोन्ही तालुक्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन स्थगित करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी माहिती दिली.
     जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रक्रीयेबाबत जाहीरनामा  प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलैला प्रसिद्ध करण्यात आली आहे.भरती प्रक्रीयेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट ला परीक्षा घेण्यात येणार होती.मात्र भोर  वेल्हा तालुके हे दुर्गम व डोंगराळ व अतिवृष्टी प्रवण असून सद्यस्थितीमध्ये पावसाला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली आहे. तालुक्यामध्ये दरडग्रस्त गावे असून नैसर्गिक आपत्तीच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असून महसूल यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजी  नियोजित लेखी परीक्षा  पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. भोर उपविभागीय कार्यालयाकडून  लेखी परिक्षेचा दिनांक व स्थळ तसेच त्यापुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल असेही प्रांताधिकारी कचरे यांनी सांगितले.
                                 
To Top