वाई ! ते दोघे पेट्रोल-डिझेल विकलेले पैसे खात्यावर भरतच नव्हते....एक वर्षात दोघांनी मालकाची केली तब्बल ५० लाखांची फसवणूक : भुईंज पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
 वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील वेळे येथे हिंदुस्थान पेट्रोल पंपाचे मालक जिजाबा राजाराम पवार यांची तब्बल 49 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक दोन जणांनी केली असून त्या दोघांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.              अद्यापही त्या दोघांना भुईंज पोलिसांनी अटक केलेली नाही याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जिजाबा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेट्रोल पंपावर काम करणारे श्रीकांत रघुनाथ येवले (रा. सटलेवाडी ता. वाई) मनोज दत्तात्रय भोसले (रा. नांदवळ ता. कोरेगाव) या दोघांनी एप्रिल 2022 ते एप्रिल 2023 यादरम्यान पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल ऑइल तत्सम दरात विक्री करून त्याची रक्कम रोख व ऑनलाईन स्वरूपात घेऊन सॉफ्टवेअर मध्ये तीन कोटी 55 हजार 985 रुपये एवढी दाखवली तर त्या त्यांनी जिजाबा पवार यांच्या खात्यामध्ये 2 कोटी 52 लाख 55 हजार616 एवढी दाखवली आहे. त्यामुळे 49 लाख 75 हजार 707 रुपयांची तफावत आढळून येत असल्याने एवढ्या रकमेचा आर्थिक अपहार केला असून त्यावरून त्या दोघांच्या विरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भंडारे हे करत आहेत.
To Top