सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी
रोटरी क्लब या जागतिक सामाजिक संस्थेच्या वर्षाची सुरुवात एक जुलै रोजी होते या दिवशी असणाऱ्या डॉक्टर्स डे चे निमित्त साधत वैद्यकीय व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिरोळ व जयसिंगपूर शहरातील डॉक्टरांचा सन्मान रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने शनिवारी करण्यात आला
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे नूतन अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सचिव तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतून शनिवारी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावीत असतान सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहून समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रंथ आणि गुलाब पुष्प भेट देऊन करण्यात आला डॉ उमेश कळेकर प्रमोद माने वीरश्री पाटील एस पी माने अजितकुमार बिरनाळे अतिक पटेल शमीम पटेल अनिक पटेल अतुल पाटील अरविंद माने या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे म्हणाले की मानवी जीवनाला जीवनदान देण्याचे कार्य डॉक्टरांच्या हातून घडत असते त्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिले जात असते या माध्यमातून ते समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा झटत असतात त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवत आहे रोटरी क्लब हेरिटेज सिटी राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्वच डॉक्टरांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य संजीव पुजारी विवेक फल्ले भरत गावडे उल्हास पाटील सचिन सावंत राहुल माने संजय पाटील चंद्रकांत भाट दिनकर पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते